
लोकसत्ता संपादकीय लेखांवरील वाचकांच्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया
‘स्वागतार्ह!’ हे संपादकीय (२८ जुलै ) वाचले. ब्रेक्झिटनंतर ब्रिटनने स्वतंत्रपणे युरोपबाहेरील देशाशी केलेला हा सर्वात मोठा आर्थिक करार समजला जातो. खरे तर भारतीय अर्थव्यवस्थेने नुकतेच ब्रिटनला मागे टाकून जगात पाचवे स्थान मिळविले. हा एका अर्थाने दोन्ही देशांसाठी समृद्धीचा करार आहे. भारतासाठी ही केवळ निर्यात संधी नसून जागतिक पातळीवरील व्यापारातील नवा आत्मविश्वास निर्माण करणारे पाऊल आहे.




