Category: ताज्या बातम्या

Maharashtra News24x7

Malegaon Bomb Blast मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण; साध्वी प्रज्ञासह सर्व आरोपी निर्दोषः

मुंबई संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या 2008 साली झाल्ल्या मालेगाव बॉम्बस्फोट ( Malegaon Bomb Blast) प्रकरणाचा निकाल तब्बल 17 वर्षांनी आला आहे. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आज मुंबई सत्र न्यायालय विशेष एनआयए कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला. यात संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर ( Sadhvi Pragya Singh Thakur) यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची

Maharashtra News24x7

मालेगाव ब्लास्ट खटल्याचा 17 वर्षांनी निकाल, साध्वी प्रज्ञा आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आरोपींच्या भवितव्याचा काय?

मुंबई मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरणातील खटल्याचा तब्बल 17 वर्षांनी उद्या दिनांक 31 जुलै गुरुवारी निकाल जाहीर होणार आहे. मालेगावातील एका मशिदीबाहेर झालेल्या या स्फोटात 6 जणांना जीव गमवावा लागला होता, तर 101 जण जखमी झाले होते. या प्रकरणानंतर पहिल्यांदाच हिंदू दहशतवाद पसरवण्याचा आरोप करण्यात आला होता. 19 एप्रिल रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाचे

Maharashtra News24x7

माढ्याजवळ रेल्वेखाली सापडून दोन बांधकाम मजुरांचा मृत्यू

सोलापूर : सोलापूर-पुणे लोहमार्गावर माढा ते वाकाव दरम्यान पायी चालत निघालेल्या दोन बांधकाम मजुरांचा समोरून येणाऱ्या पंढरपूर-म्हैसूर गोलगुंबज एक्स्प्रेसच्या इंजिनला धक्का लागून दोघेही दूर फेकले जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा मजूर जखमी झाला. विजय कय्यावाले आणि राहुल अशोक बेंजरपे (दोघे रा. लष्कर, लोधी गल्ली, सोलापूर) अशी दोघा मृत बांधकाम मजुरांची नावे आहेत. तर

Maharashtra News24x7

चंद्रभागेला पूर; पंढरपूरला पुन्हा पूरस्थिती

पंढरपूर : वीर आणि उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. त्याचा परिणाम येथील भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीवर दिसून आला आहे. उजनी धरणातून ७१ हजार तर वीर धरणातून ३२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. येथील वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील

Maharashtra News24x7

नगरमध्ये बनावट नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक

अहिल्यानगर : पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाजारात खपवण्यासाठी आणणाऱ्या दोघांना नगर तालुका पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १६० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. यासह दोघांकडून तीन मोबाइल फोन, चारचाकी वाहन, २१७० रुपयांच्या खऱ्या नोटा असा एकूण १७ लाख ३७ हजार ८७० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. सोमनाथ माणिक शिंदे (वय २५, रा. तपोवन रस्ता, अहिल्यानगर) व

Maharashtra News24x7

वानखेडे स्टेडियममधून आयपीएल संघांच्या जर्सी चोरीला, सुरक्षा व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

ipl teams jersey stolen Wankhede stadium Mumbai case against security manager वानखेडे स्टेडियममधून आयपीएल संघांच्या जर्सी चोरीला, सुरक्षा व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

Maharashtra News24x7

लोकसत्ता संपादकीय लाडकी बहिन योजनेवर २६ लाख महिलांना डिजीटल प्रणालीतील पळवाट महाराष्ट्र सरकार अग्रलेख : डिजिटल धिंडवडे!

प्रामाणिक करदात्यांच्या पैशातून लाडक्या बहिणींना ओवाळणी घालण्याचा उद्योग राज्यकर्त्यांनी केला; त्यांनीच आता लोकांच्या प्रश्नांची उत्तरेही द्यावीत… ‘लाडकी बहीण’ योजना ही राजकारणाने ‘डिजिटल इंडिया’ची आणि त्यापेक्षाही अधिक महाराष्ट्र सरकारच्या कार्यक्षमतेची धिंड काढते, असे म्हटल्यास त्यात अजिबात अतिशयोक्ती नाही. राज्यातील बँकांच्या बुडीत खात्याकडे निघालेल्या कृषी कर्ज रकमेवर गेल्या आठवड्यात ‘लोकसत्ता’ने भाष्य केले. ही रक्कम ३१ हजार कोटींहून

Maharashtra News24x7

तर्कतीर्थ विचार : विविध संस्कृतींचा संगम आवश्यक

विसाव्या शतकाच्या मध्यावर सार्वजनिक गणेशोत्सवात समाजधुरीणांची व्याख्याने आवर्जून आयोजित केली जात असत. शिवाजी मंदिर, पुणेच्या अशा सार्वजनिक गणेशोत्सवात ३० ऑगस्ट १९४९ रोजी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे ‘हिंदू धर्म व सांस्कृतिक चळवळीची दिशा’ विषयावर व्याख्यान योजण्यात आले होते. साप्ताहिक ‘विवेक’च्या १८ सप्टेंबर १९४९ च्या अंकात ते पुढे विधिवत प्रकाशित झाले होते. त्यानुसार तर्कतीर्थांनी भाषणाच्या प्रारंभीच स्पष्ट

Maharashtra News24x7

कुतूहल : प्रजाती ओळखण्याचे डीएनए तंत्र

तुम्ही सुपरमार्केटमध्ये खरेदीवेळी वस्तू स्कॅन केल्या जात असल्याचे नक्कीच पाहिले असेल. स्कॅन करताच त्या लेबलवर असणाऱ्या उभ्या जाड आणि बारीक काळ्या रेषांमध्ये दडलेली माहिती जशी वस्तूचे नाव, किंमत, ब्रँड, अगदी शिल्लक नगदेखील क्षणार्धात कॅशियरच्या संगणकावर झळकते. या रेषांना आपण बारकोड म्हणतो. सुपरमार्केटमधील हा बारकोड प्रत्येक वस्तूची ओळख निर्माण करतो. जैवविविधतेने नटलेल्या निसर्गात प्रत्येक सजीवाच्या अनेक

Maharashtra News24x7

उलटा चष्मा : फुगा… फुगवलेला आणि फुटलेला!

‘मोदी हे मिडियाने फुगवलेला फुगा,’ या धारदार वक्तव्याला देशभर प्रसिद्धी मिळाल्याने राहुलजी जाम खुशीत होते. घरी परतल्यावर त्यांनी त्यांच्या आवडत्या दंडबैठका मारायला सुरुवात केली. तेवढ्यात एक सहायक जवळ येत कानात कुजबुजला. सत्ताधारी म्हणताहेत, मोदींनी तुमच्या फुग्यातील हवा एकदा नाही तर तीनदा काढली. हे ऐकताच ते अस्वस्थ झाले. व्यायाम थांबवून क्षणभर विचार केल्यावर त्यांनी हुकूम सोडला.